श्री. विश्वनाथ राणे

Message from श्री. विश्वनाथ वसंत राणे सस्नेह प्रणाम……!!!

Corporator shri Vishwanath Rane 
(Ward 24 ,  Telkoswadi)

मी, विश्वनाथ वसंत राणे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अभ्यासू नगरसेवक व आपल्या प्रभागाचा लोकप्रतिनिधी.

महानगर पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सर्व मूलभूत सोई–सुविधा प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे, हे माझे आद्य कर्तव्य आहे. तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील वातावरण सर्वांगाने पोषक व सुरक्षित बनविणे ही देखील माझी जबाबदारी असल्याची जाणीव मला सतत आहे.

आपण सर्व नागरिक माझे डोळे आहात, माझे सहकारी हात आहात.

आपल्या चाळ/इमारत/सोसायटी तसेच आजूबाजूच्या परिसरातील ज्या काही सामाजिक समस्या असतील, तक्रारी असतील, अत्यावश्यक दुरुस्ती किंवा विकासकामांची गरज भासेल, त्या सर्व बाबींबाबतच्या आपल्या सूचना आपण निःसंकोचपणे माझ्यापर्यंत पोहोचवाव्यात, त्यांचे नेहमीच स्वागत असेल. मी स्वतः आणि माझी कार्यालयीन जनसंपर्क टीम आपली समस्या शक्य तितक्या लवकर दूर करण्यासाठी सदैव तत्पर आहोत.

तसेच महानगर पालिकेच्या माध्यमातून आपल्या प्रभागात होणारी दैनंदिन स्वच्छता (घंटागाडी, औषध फवारणी), पाणीपुरवठा, रस्ते–गटारे, प्रकाश व्यवस्था, उद्याने, आरोग्यविषयक सुविधांबाबतची अद्ययावत माहिती आपणास वेळोवेळी देत राहू. आपल्या प्रभागात सुरू असलेली व नियोजित विकासकामे याबाबतदेखील आपली बहुमूल्य मते जाणून त्यानुसार यथोचित कार्यपद्धती आखण्याचा प्रयत्न सतत करत राहू.

अशाप्रकारे आपण माझे डोळे व हात बनून जर सोबत उभे राहिलात, तर अनेक डोळ्यांनी पाहिलेले प्रश्न आणि अनेक हातांनी घेतलेली मेहनत यामुळे आपला प्रभाग एक आदर्श प्रभाग म्हणून नावारूपाला आणणे, हा माझा प्रामाणिक व ठाम संकल्प आहे.

शिवसेनेच्या विचारधारेतून आणि माननीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनातून मला जे बळ मिळते, ते फक्त व फक्त आपल्या आशीर्वादामुळेच अधिक दृढ होत आहे.

आपल्या सहकार्याच्या आणि निरंतर आशीर्वादाच्या अपेक्षेने…

आपला नम्र स्नेहांकित,
श्री. विश्वनाथ वसंत राणे
अभ्यासू नगरसेवक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

उपक्रम आणि कार्य

दृष्टी (Vision)

प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा आणि त्यावर प्रामाणिक, जबाबदार आणि वेळेवर कार्यवाही व्हावी—असा संवाद-केंद्रित, लोकाभिमुख प्रभाग उभारणे

ध्येय (Mission)

प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता या तत्त्वांवर कार्य करून प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची पूर्तता पोहोचवणे हेच उद्दिष्ट.

दृष्टी (Vision)

प्रत्येक नागरिकाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचावा आणि त्यावर प्रामाणिक, जबाबदार आणि वेळेवर कार्यवाही व्हावी—असा संवाद-केंद्रित, लोकाभिमुख प्रभाग उभारणे

ध्येय (Mission)

प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि लोकाभिमुखता या तत्त्वांवर कार्य करून प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत विकासाची पूर्तता पोहोचवणे हेच उद्दिष्ट.

फोटो

व्हिडिओ

संपर्क

कार्यालय पत्ता

दुकान क्रमांक १, सर्वोदया गंगा, टेल्कोसवाडी, डोंबिवली पश्चिम

मोबाईल नंबर

+91 9323312956

Scroll to Top